तळाशिल बांधऱ्याची झालेली कामे योग्य रीतीनेच
राजकीय स्वार्थासाठी तळाशिलच्या विकासकामांना माध्यम बनवू नये
आचरा प्रतिनिधी
दोन दिवसापूर्वी एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तळाशील जात घालण्यात आलेल्या बंधाऱ्याची पाहणी करत बंधाऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे सांगत आमदार वैभव नाईक हेच त्याला जबाबदार असल्याचे सांगत आमदार नाईक यांनी तळाशिल ग्रामस्थांनी फसवणूक केली असल्याचे विधान केले होते. या विधानानंतर तळाशिल ग्रामस्थांनी श्रीकृष्ण मंदिर येथे बैठक घेत त्या विधानाचा निषेध नोंदवला आहे. तळाशिल हे नैसर्गिक आपत्तीच्या दृष्टीने संवेदनशील आहे आणि या भागाच्या सुरक्षिततेसाठी आवश्यकअसणाऱ्या बांधाऱ्याची कामे आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून योग्य पद्धतीने चालू असताना काहीजण राजकीय स्वार्थासाठी ग्रामस्थांकडून कोणतीही माहिती न घेता करत असलेल्या खोटी विधाने करत दिशाभूल करत आहेत असे सांगत तळाशिल ग्रामस्थांनी झालेल्या बैठकीत त्या विधानाचा निषेध नोंदवला.
तळाशिलातील बांधऱ्याचे काम योग्य रीतीने चालू
बांधाऱ्यावरून करण्यात आलेल्या विधानाचा समाचार घेण्यासाठी तळाशील ग्रामस्थांनी मंडळाचे अध्यक्ष जयहरी कोचरेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली या बैठकीत बोलताना ग्रामस्थ करून म्हणाले की तळाशिलातील झालेले बंधारे हे मंत्री नारायण राणे, आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून झालेले आहेत आज जी कामे होत आहेत ती आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून होत आहेत. आमदार नाईक यांच्या प्रयत्नांनातून घालण्यात आलेल्या बंधाऱ्याचे काम उत्कृष्ट झाले आहे. तळाशिलात विविध विकासकामे आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून चालू आहेत, आज कोणीतरी उठतो आणि होणाऱ्या विकासकामांबाबत आरोप करत सुटतो अशांनी अगोदर ग्रामस्थांकडून कामांबाबत माहिती घ्यावी आणि मगच आरोप करावेत.
राजकीय स्वार्थासाठी तळाशिलच्या विकासकामांना माध्यम बनवू नये
बैठकीत ग्रामस्थ म्हणाले की तळाशिल गाव हा नैसर्गिक आपत्तीच्या दृष्टीने संवेदनशील आहे. तळाशील वाचवण्यासाठी आतापर्यंत राणे, नाईक व उपरकर यांनीही प्रयत्न केलेले आहे. गावातील विविध विकासकामांसाठी आम्हा ग्रामस्थांना आंदोलन, उपोषण सारख्या मार्गांचा अवलंब करावा लागत आहेत. त्यामुळे ही बंध्याऱ्याची कामे होत आहेत असे असताना काहीजण उणीवा काढून आरोप प्रत्यारोप करत आहेत. आरोप करणाऱ्यांनी राजकीय स्वार्थासाठी तळाशिलच्या विकास कामांना माध्यम बनवू नये. खोट्या आरोपांमुळे चालू असलेली कामे रखडली तर त्याला जबाबदार कोण त्याची जबाबदारी हे फुकाचे आरोप करणारे घेणार काय असा सवाल ग्रामस्थांनी केला.









