शिवाजीनगर नागरिकांना एलअँडटी कंपनीचे आश्वासन
बेळगाव : शिवाजीनगर पहिली गल्ली, पाचवा क्रॉस येथील गेल्या काही महिन्यांपासून दूषित पाणीपुरवठा केला जात होता. त्यामुळे त्याचा सर्वसामान्य जनतेला त्रास सुरू झाला. याबाबत स्थानिक नागरिकांनी नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर त्यांनी एलअँडटी कंपनीच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. तातडीने दखल घेत बुधवारी ते अधिकारी दाखल झाले. त्यांनी पाहणी केली व शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे. शिवाजीनगर परिसरात घालण्यात आलेली पाईप खराब झाले आहेत. ते पूर्णपणे बदलावेत अशी मागणी नागरिकांनी केली. त्यानुसार तातडीने पाईप बदलून शुद्ध पाणीपुरवठा केला जाईल, असे एलअँडटी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी पाणीपुरवठा मंडळाचे अधिकारी, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, एलअँडटी कंपनीचे व्यवस्थापक धीरज अभयकर, विजयानंद सोलापूर, उमेश निट्टूरकर, प्रकाश कोष्टी यांच्यासह या परिसरातील नागरिक उपस्थित होते.









