आचरा पोलिसांनी वृध्द महिलेची दखल घेत दिला आधार
आचरा प्रतिनिधी
आचरा पिरावाडी येथे गुरुवारी रात्री एक वृध्द महिला बिथरलेल्या अवस्थेत आढळून आली होती. सदर रुध्द महिलेला बोलता व ऐकता येत नसल्याने तिची ओळख पटत नव्हती. आचरा पोलिसांना याची खबर मिळताच तात्काळ आचरा पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस फौजदार मीनाक्षी देसाई यांनी गाठत महिलेला धीर देत स्थानिकांच्या मदतीने आचरा पोलीस ठाण्यात नेले त्यानंतर सखी केंद्राशी सपंर्क करत सखी केंद्राचा आधार मिळवून दिला आहे. या महिलेस ओळखणाऱ्या व्यक्तींने आचरा पोलीस किंवा सखी केंद्र सिंधुदुर्गशी सपंर्क करण्याचे आवाहन आचरा पोलिसांनी केले आहे.
आचरा पिरावाडी येथे गुरुवारी रात्री एक रुध्द महिला बसलेली आढळून आली होती. स्थानिकांनी त्या महिलेकडे चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता त्या महिलेस बोलता ऐकता येत नसल्याचे दिसून आले सदर वृध्द महिला ही बोलत नसल्याने ती कुठून आली हे समजत नव्हते. स्थानिक ग्रामस्थांनी शेवटी याची माहिती आचरा पोलिसांना दिली. आचरा पोलिस मीनाक्षी देसाई, मनोज पुजारे, एम एम परब हे त्याठिकाणी दाखल होत त्या बिथरलेल्या महिलेस स्थानिक महिलांच्या सहकार्याने धीर दिला. बिथरलेली वृध्द महिला शांत झाल्यावर तिला आचरा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. आचरा पोलिसांनी सखी केंद्राशी संपर्क करत त्या वृध्द महिलेला आधार मिळवून दिला आहे









