साक्षीदार भवनवरील दिवाबत्ती मोडकळीस
बेळगाव : न्यायालयाच्या इमारती उभ्या केल्या जातात. परंतू त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जाते. जेएमएफसी न्यायालयाच्या आवारात बांधण्यात आलेल्या कँटीनला लागून असलेल्या साक्षीदार भवनवरील ट्युबलाईट मोडकळीस आली आहे. ती कधी पडेल याची शाश्वती नाही. तेव्हा तातडीने तिची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. या इमारतीला लागूनच कँटीन आहे. त्यामुळे त्या ठिकाणी नेहमीच गर्दी असते. बरेच जण त्या ठिकाणी बोलत देखील थांबलेले असतात. लोखंडी खांब असलेली ही विद्युत ट्यूब अचानक कोसळली तर गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा तातडीने तिची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. याचबरोबर नवीन बांधण्यात आलेल्या इमारतीशेजारी विटा तसेच इतर साहित्य ठेवले आहे. तेदेखील हटवावे, अशी मागणी होत आहे. नवीन इमारतीला लागूनच असलेल्या चेंबरची दुरुस्ती केली आहे. त्या ठिकाणीही विटा ठेवल्या आहेत. त्यामुळे ये-जा करताना अडथळा निर्माण होत आहे.









