वृत्तसंस्था /कोलंबो
लंकन क्रिकेट मंडळाच्या नव्या निवड समिती प्रमुखपदी माजी फलंदाज उपूल थरंगाची नियुक्ती केल्याची घोषणा क्रीडामंत्री हेरीन फर्नांडो यांनी केली. लंकन क्रिकेट मंडळाने थरंगाच्या निवड समिती प्रमुखपदाला अधिकृत मान्यता दिली आहे. लंकन निवड समितीमध्ये पाच सदस्यांचा समावेश आहे. माजी क्रिकेटपटू अजंता मेंडीस, इंडिका डी सेराम, थरंगा, परणवितना, दिलरूवान परेरा यांचा समावेश आहे. या नव्या निवड समितीचा कालावधी 2 वर्षांचा राहील. लंपेचा संघ पुढील महिन्यात झिंबांब्बे विरुद्ध 6 सामन्यांची मालिका कोलंबोत खेळणार आहे. ही मालिका 6 ते 18 जानेवारी दरम्यान खेळविली जाईल.









