वृत्तसंस्था/ शिलाँग
शिवा थापा व अमित पांघल या बॉक्सर्सनी येथे सुरू असलेल्या पुरुषांच्या राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये आपापल्या वजन गटातून उपांत्यपूर्व फेरी गाठली.
63.5 किलो वजन गटात खेळणाऱ्या शिवा थापाने गेल्या वर्षी सुवर्णपदक मिळविले होते. त्याने कर्नाटकच्या संतोष एचके याचा 5-0 असा एकतर्फी पराभव करीत आगेकूच केली. त्याची पुढील लढत दिल्लीच्या शशांक प्रधानशी होईल. एसएससीबीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अमित पांघलने 51 किलो वजन गटाच्या लढतीत पंजाबच्या जयशनदीप सिंगचे आव्हान 4-1 असे संपुष्टात आणले. त्याची उपांत्यपूर्व लढत जम्मू काश्मिरच्या मोहम्मद आरिफशी होईल.









