वृत्तसंस्था / बरेली
पुरुषांच्या राष्ट्रीय मुष्टीयुद्ध चॅम्पियनशीप स्पर्धेत वेल्टरवेट गटातील विद्यमान विजेत्या शिवा थापाचे आव्हान उपांत्य फेरीत हिमाचलप्रदेशच्या अभिनेश जमवालने संपुष्टात आणले.
पुरुषांच्या वेल्टरवेट गटातील उपांत्य सामन्यात अभिनेश जमवालने शिवा थापाचा सरस गुणांवर पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. त्याने या स्पर्धेत अनेक अव्वल प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली आहे. अभिनेशने या वजन गटात वंशराज कुमारचा पराभव केला होता. या स्पर्धेत सेनादलाच्या संघाने आपले वर्चस्व कायम राखले असून त्यांचे 10 पैकी 8 स्पर्धक विविध वजन गटात अंतिम फेरी गाठली आहे. सेनादलाच्या सचिन सिवाचने हरियाणाच्या पुजानीचा लाईट वेटगटात, लक्ष्य चहरने लाईट हेवी व्हेट गटात निजोरामच्या मालसामुटुंगाचा पराभव केला. सुपर हेवीवेटगटात उत्तराखंडच्या नरेंद्रने सेनादलाच्या गौरव चौहानचा उपांत्य फेरीत प्रवेश करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. आता अनशुल गिल आणि नरेंद्र यांच्यात सुवर्णपदकासाठी लढत होईल.









