कोल्हापूर :
कोल्हापूरी ही अतिशय सुदंर चप्पल असून मला कधीही न मिळू शकणारी गोष्ट लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यामुळे मिळाली. हाताने बनवलेली ही चप्पल मला खूप आवडली. धन्यवाद ‘लक्ष्मीकांत’. तू आज या जगात नाहीस पण या सुंदर कोल्हापूरीच्या माध्यमातून तू कायम आठवणीत राहशील, अशा शब्दात ज्येष्ठ सिनेअभिनेत्री नीना गुप्ता यांनी कोल्हापूर चप्पलचे तोंडभरुन कौतुक करत लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबतच्या आठवणींना सोशल मीडियावरुन उजाळा दिला.
जेष्ठ सिने अभिनेत्री नीना गुप्ता यांनी नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन कोल्हापूरी चप्पलचे कौतुक केले आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्ती गुप्ता म्हणाल्या, आज कल कोल्हापूर चप्पल मोठी चर्चेत आहे. मी खूप वर्षांपुर्वी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत एका चित्रपटामध्ये काम केले होते. त्यावेळी मी त्यांना मला कोल्हापूरवरुन कोल्हापूरी चप्पल आणून देणार का, असे विचारले होते आणि त्यांनी मला ते आणून दिले होते. कोल्हापूरी ही अतिशय सुदंर चप्पल असून मला कधीही न मिळू शकणारी गोष्ट लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यामुळे मिळाली. हाताने बनवलेली ही चप्पल मला खूप आवडली. धन्यवाद ‘लक्ष्मीकांत’. तू आज या जगात नाहीस पण या सुंदर कोल्हापूरीच्या माध्यमातून तू कायम आठवणीत राहशील, आशा शब्दात अभिनेत्री गुप्ता यांनी भावना व्यक्त केल्या.
- अजूनही चप्पल ठेवले जपून
नीना गुप्ता यांना बऱ्याच वर्षापूर्वी दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी कोल्हापूरी चप्पल भेट दिली होती. त्यांनी ही कोल्हापूरी चप्पल अजूनही जपून ठेवली आहे. त्यांनी सोशन मीडीयावर शेअर केलेल्या पोस्ट मध्ये हीच कोल्हापूरी चप्पल परिधान केले आहे.








