ऑनलाईन टीम/ तरुण भारत
मुंबई : शिवसेनेच्या बंडाने शिवसेनेत दुफळी पडली असतानाच आता पुन्हा एकदा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना शिंदे गटाने आणखी एक धक्का दिला आहे. ठाणे महानगरपालिकेतील 66 नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांना पाठिंबा देत शिंदे गटात सहभाग नोंदवला आहे. आधी आमदार आणि आता नगरसेवकांच्या या निर्णयामुळे सेनेला मोठा धक्का बसल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.
सेनेच्या अडचणीत वाढ
याआधी ठाण्याचे महापौर आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनात पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता नगरसेवकही शिंदे गटाकडे वळल्याने शिवसेनेची चिंता वाढली आहे. आगामी महापालिका निवडणुकीआधीच ठाण्यातील 66 नगरसेवकांनी शिंदे यांना पाठिंबा दिल्याने शिवसेनेपुढील अडचणी वाढल्या आहेत.
हेही वाचा- पक्ष नेतृत्वाला चुकीचे सल्ले देणाऱ्यांनीच सेनेचं नुकसान केलं-केसरकर
ठाणे जिल्ह्यावर एकनाथ शिंदेंची मजबूत पकड
शिवसेनेचे बंडखोर नेते आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी आनंद दिघे यांच्या निधनानंतर ठाणे जिल्ह्याची सूत्रे आपल्य़ा हाती घेतली. ठाणे जिल्ह्यावर त्यांची मजबूत पकड आहे. येत्या काही महिन्यात ठाणे महापालिकेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. या महापालिकेत शिवसेनेचे 67 नगरसेवक सेवक आहेत. 66 नगरसेवकांनी शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतल्याने आता मुंबई महापालिकेची निवडणूकीत सेनेला सुरुवातीपासून तयारी करावी लागणार आहे. त्यातच ठाण्याचे खासदार राजन विचारे यांची शिवसेना लोकसभा प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे आता सेनेसमोरच्या अडचणीत वाढ झाली आहे.
हेही वाचा-पालकमंत्रीपद गेल्यानंतरही सतेज पाटील महापूराला तोंड देण्यास सज्ज; दिल्या ह्या सुचना
ठाणे महानरपालिकेत पक्षानुसार नगरसेवकांची संख्या
ठाणे महापालिकेत शिवसेनेचे 67 नगरसेवक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस 34, भाजप 23, काँग्रेस 3 आणि एमआयएमकडे 2 नगरसेवक आहेत.