क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
शिक्षण खात्यातर्फे घेण्यात आलेल्या गोमटेश विद्यापीठ आयोजित तालुकास्तरीय प्राथमिक विभागीय व्हॉलिबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ठळकवाडी हायस्कूल संघाने खासबाग क्लस्टर संघाचा 2-0 अशा सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकाविले.
गोमटेश विद्यापीठ येथे आयोजित करण्यात आलेल्या प्राथमिक विभागिय तालुका व्हॉलिबॉल स्पर्धेत ठळकवाडी संघाने कणबर्गी क्लस्टरचा 15-11, 13-15 व 16-14 अशा सेटमध्ये पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात ठळकवाडी संघाने खासबाग क्लस्टर संघाचा 15-12, 15-11 अशा सरळ सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकाविले.
या विजेत्या संघाला ठळकवाडी हायस्कूलचे क्रीडा शिक्षक विवेक पाटील यांचे मार्गदर्शन तर मुख्याध्यापक राजू कुडतरकर व सी. वाय. पाटील, एस. एन. गावडे यांचे प्रोत्साहन लाभत आहे.









