वृत्तसंस्था/ थायलंड
थायलंडच्या महाराणी सिरिकिट यांनी शुक्रवारी रात्री वयाच्या 93 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. रॉयल हाऊसहोल्ड ब्युरोने शनिवारी त्यांच्या निधनासंबंधीची माहिती जारी केली. महाराणींच्या निधनामुळे राजघराणे आणि राजघराण्यातील अधिकाऱ्यांसाठी एक वर्षाचा शोककाळ जाहीर करण्यात आला आहे. तसेच पंतप्रधान अनुतिन चार्नविराकुल यांनी मलेशियातील आसियान शिखर परिषदेला भेट रद्द केली आहे.
युद्धोत्तर काळात महाराणी सिरिकिट यांनी देशाच्या राजेशाहीमध्ये ग्लॅमर, प्रतिष्ठा आणि आधुनिकतेचा एक नवीन आयाम जोडला. 2012 मध्ये आरोग्याच्या समस्या सुरू झाल्यानंतर त्या सार्वजनिक जीवनापासून दूर होत्या. 2019 पासून रुग्णालयात दाखल असलेल्या सिरिकिट यांना 17 ऑक्टोबर रोजी रक्तसंसर्ग झाल्यानंतर त्यांची प्रकृती आणखीच खालावली होती.









