फुमथम वेचायचाई यांनी घेतली जबाबदारी
वृत्तसंस्था/बँकॉक
थायलंडला दोन दिवसांत दुसरे पंतप्रधान मिळाले आहेत. गृहमंत्री फुमथम वेचायचाई यांनी गुरुवारी कार्यवाहक पंतप्रधान म्हणून जबाबदारी स्वीकारली. त्यांनी 24 तासांसाठी पंतप्रधान असलेल्या सूर्या जुंग्रुनग्रेकिट यांची जागा घेतली आहे. बुधवारी देशाचे कार्यवाहक पंतप्रधान म्हणून सूर्या जुंग्रुनग्रेकिट यांची नियुक्ती करण्यात आली होती. 1 जून रोजी पदावरून काढून टाकण्यात आलेल्या निलंबित पंतप्रधान पिथोंगटार्न शिनावात्रा यांची जागा 70 वर्षीय सूर्या यांनी घेतली होती. पतोंगटार्न शिनावात्रा यांच्यावर एका वरिष्ठ कंबोडियन नेत्याशी फोनवरून संभाषण केल्याचा आरोप करण्यात आला होता.









