Eknath Shinde : दादरमध्ये मध्यरात्री झालेल्या शिंदे- ठाकरे गटाच्या राड्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शाखाप्रमुख संतोष तेलवणे यांच्यात फोनवरुन चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये शिंदे यांनी ठाकरे गटाला जशास तसे उत्तर देण्याचे आदेश दिल्याचं सांगितलं जात आहे. सदा सरवणकर यांच्यावर बंदूक बाळगल्याचा आणि हवेत गोळीबार केल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. त्याचीही शहानिशा पोलिसांकडून केली जात आहे. तर ठाकरे गटातील ५ जणांना काल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, अरविंद सावंत हे दादर पोलीस स्थानकात दाखल झाले आहेत.
या राड्यानंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईला अस्वस्थ करण्याचं काम पेंग्विन सेनेकडून होत असेल ते चुकीचे आहे. समाजमाध्यमांवर वारंवार सेनेकडून अशा प्रकारचा प्रसार केला जात आहे. जनतेच्या मनात देखील याबबात खदखद असल्याचं म्हणत त्यांनी सेनेवर निशाणा साधला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








