deepakkesarkar- वारंवार खोक्याची भाषा बोलणाऱ्यांनी जनतेला हे देखील सांगावे कि, आम्हीच सांगितले होते कि, तुम्ही निघून जावा. तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः असे सांगितले आहे. हे तुम्ही जनतेला सांगण्याचे धाडस दाखवावे, असे आव्हान पालकमंत्री आणि शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिले. ते कोल्हापुरात बोलत होते.
कर्नाटक सरकार ज्या पद्धतीने वागते, त्या पद्धतीची संस्कृती महाराष्ट्राची नाही. महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटक सरकारने अडवले. पण त्यांचे तीन मंत्री कोल्हापुरात येऊन गेले. मनात आले असते तर आम्हीही त्यांना अडवले असते. या वादात खूप वेळा आंदोलन झाली आहेत. यातून मार्ग निघावा यासाठी दोन्ही राज्यपालांची बैठक झाली आहे.न्यायालयात आपल्याला न्याय मिळेल असा विश्वास पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त करत महाराष्ट्र -कर्नाटक प्रश्नावर आंदोलन करणारे राजकीय पोळी भाजत असल्याचा टोला शिवसेनेचे नेते आणि आमदार हसन मुश्रीफ यांना नाव न घेता लगावला.सीमाभागातील ज्या योजना बंद झाल्या, त्या योजना आम्ही तात्काळ चालू करतो. सीमाभागातील नागरिकांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक लावण्याचे आश्वासन पालकमंत्री केसरकर यांनी दिले.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची एसआयटी चौकशीवरून बोलताना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी, दिशा सालियान हिला न्याय द्यायचा आहे. एसआयटी चौकशी नेमण्याची मागणी झाल्यानंतर ती नेमण्यात आली. त्यात दोषी असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे. असे केसरकर म्हणाले. ज्यांनी खोके घेतले ते तुरुंगात जाऊन आलेत. ज्यांचा लोकशाहीवर विश्वास नसतो ते ठोकशाहीची भाषा करतात. आमदार कधीही पैशासाठी फुटत नाहीत, पैशा पेक्षा या आमदारकी मोठी आहे.जे चार वेळा निवडून आले ते पैशासाठी फुटतील काय? असा सवाल केसरकर यांनी केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील कथित जमीन घोटाळा आरोपावर बोलताना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना फैलावर घेतले. ज्या युती सरकारला जनतेने निवडून दिले आहे, तेच सरकार सत्तेत आले आहे. तुम्हाला जिथं जायचे तिथं जा, असे केसरकर यांनी सांगत नागपूर हायकोर्टानं सांगितलं आहे की हे प्रकरण क्लोज झालं आहे. जमीन कुणालाही दिली नाही, संजय राऊत यांचं अज्ञान आहे. ज्या लोकांनी महापालिकेत काय काय केलं? हे बाहेर येईल म्हणून हे बोलत आहेत. त्यावरून आम्ही टीका केली की काय होतंय हे आता समोर आलंय. संजय राऊत यांनी बोलत रहावं, टीका करत रहावं आम्ही काम करत राहतो. असा टोला पालकमंत्री दीपक केसरकर यांनी लगावला.
संजय राऊत यांनी एखादी सूचना मांडली असती तर आनंद झाला असता. राष्ट्रवादीची शिवसेना झाली हे काही चुकीचं नाही. आदित्य ठाकरे यांना काँग्रेसची लोकं जवळची वाटतात. त्यांना आपली लोकं नको झाली, आम्ही परत येतो पण दोन्ही काँग्रेसला सोडा असं म्हणत होतो. पण आम्हाला उद्धव ठाकरे यांनी तुम्ही देखील निघून जा म्हटलं होतं, असे स्पष्टीकरण देखील केसरकर यांनी दिले.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









