सावंतवाडी / प्रतिनिधी
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या सातार्डा येथील नम्रता झारापकर यांची निवड खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. यापूर्वी मळेवाड विभागीय महिला संघटक म्हणून त्यांनी काम केले आहे. गेली सात वर्षे त्या शिवसेनेत काम करत आहेत. त्यांच्यावर आता सावंतवाडी तालुका महिला प्रमुख पदाची धुरा सोपवण्यात आली आहे. खासदार विनायक राऊत यांनी या निवडीचे पत्र दिले आहे. यावेळी शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, जिल्हाप्रमुख संजय पडते , बाळा गावडे ,तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, योगेश नाईक ,आदी उपस्थित होते . यावेळी श्री झारापकर म्हणाल्या तालुक्यात शिवसेना पक्षाची संघटना वाढीच्या दृष्टीने आपण काम करणार आहे व महिलांची फळी अधिक बळकट केली जाणार आहे.









