शिंदे शिवसेनेच्या उमेदवाराचा पाच विरुद्ध तीन मतांनी पराभव
न्हावेली / वार्ताहर
वेत्ये ग्रामपंचायत उपसरपंच पदी ठाकरे शिवसेनेचे महेश उर्फ बाळू गावडे यांची निवड करण्यात आली.वेत्ये ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेविका स्वाती कदम यांच्या उपस्थितीत आज उपसरपंच पदासाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत ठाकरे शिवसेनेचे महेश उर्फ बाळू गावडे यांनी शिंदे गटाच्या राजन आंबेकर यांचा ५ विरुद्ध तीन मतांनी पराभव केला. यावेळी शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच यांचा ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ व सरपंच गुणाजी गावडे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी चंद्रकांत कासार, माजी सरपंच सुनील गावडे, शितल खांबल,शेखर खांबल, विजय गावडे, संदीप गावडे विश्वास गावडे, सचिन गावडे संतोष गावडे, शरद जाधव, आर्यन राऊळ आदी उपस्थित होते.









