Sanjay Raut शिवालय आणि विधीमंडळाच्या कार्यालयावर शिंदे गटाने ताबा घेतल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, “ही चोरांची शिरजोरी आहे. त्यांनासमेरून लढता येत नाही किवा तपास यंत्रणा निवडऩक आयोग यांच्याकडून हवे तसे निकाल मिळवायचा हे सध्या सुरु आहे. त्यांना महाशक्तीचा पाठींबा आहे. हातात सत्ता आल्याने त्यांनी शिवालय आणि विधीमंडळ कार्यालयाचा ताबा घेतला आहे. ही सर्व चढाई औटघटकेची आहे. बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक आजही मान राखून आहेत.
“त्या दोन्ही वास्तू सरकारी होत्या सरकार त्यांचं आहे त्यामुळे त्याला काही महत्व नाही. उद्या सत्ते वर कोणी रहायचं हे जनता ठरवेल. या मस्तवालपणाच्या गंडस्थळावर प्रहार करण्याची ताकत शिवसेनेकडे आहे आणि महाराष्ट्रातील जनतेकडे आहे. त्यांचा हा आनंद औटघटकेचा आहे.”
सुप्रिम कोर्टाने 2 हजार कोटींचा घोडेबाजार झाला याचा कुठेही उल्लेख केला नाही यावर विचारले असता, ते म्हणाले सुप्रिम कोर्टाकडे सांगण्याची कोणतीही गरज नाही. आम्ही सांगतोय ना….काही लोकांना आपल्या मुर्खपणाचा आत्मविश्वास असतो. आम्ही काय सांगतोय त्यांना कळत नाही. आम्ही काल जी काय भुमिका मांडलीय कि आतापर्यंत 2 हजार कोटी खर्च झाले आहेत. या व्यवहारात शिवसेना हे नाव आणि त्याच पक्षचिन्हाचा सौदा झाला. मी माझ्या आरोपावर ठाम आहे. आताप्रर्यंत माझ्यावर 32 ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. 1 लाख गुन्हे जरी माझ्यावर दाखल झाले तरी मी मागे हटणार नाही. मी शिवसेनेबरोबरच राहीन” अशी स्पष्ट भुमिका खासदार संजय राऊत यांनी मांडली.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








