Kolhapur Shivsena News : कोल्हापूर जिल्ह्यातील ठाकरे गटाची शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर उभी आहे. ठाकरे गटाच्या पक्षातील जिल्हाध्यक्षांच्या विरोधात मोहीम उघडली असून त्याबाबतची तक्रार उद्धव ठाकरे यांच्याकडे कार्यकर्त्यांनी दिली आहे. जिल्हाध्यक्ष विजय देवणे हे सेटलमेंट करून आंदोलन करत असल्याचा कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे.
ठाकरे गटाच्या पक्षातील जिल्हाध्यक्षांच्या विरोधात मोहीम उघडली असून त्याबाबतची तक्रार उद्धव ठाकरे यांच्याकडे कार्यकर्त्यांनी दिली आहे. जिल्हाध्यक्ष विजय देवणे हे सेटलमेंट करून आंदोलन करत असल्याचा कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे.राधानगरी, आजरा,चंदगड, गडहिंग्लज, भुदरगड, गडहिंग्लज आणि कागल मधील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबईतील सेना भवन येथे जाऊन जिल्हाध्यक्ष विजय देवणे यांच्या बाबत तक्रार दिली. देवणे यांच्या कार्यक्षमतेवर अनेक प्रश्न उपस्थित करून वरिष्ठांच्या समोर तक्रारीची गाऱ्हाने मांडली. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील ठाकरे गटांमध्ये देखील अस्वस्थता असून योग्य निर्णय न झाल्यास वेगळा विचार करण्याची देखील शक्यता व्यक्त केली असल्याची माहिती आहे.








