ऑनलाईन टीम / तरुण भारत :
शिवसेना ठाकरे गटाने लोकाधिकार महासंघाची कार्यकारिणी जाहीर केली आहे. अध्यक्षपदी खा. अनिल देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सरचिटणीसपदी प्रदीप मयेकर तर कार्याध्यक्षपदाची जबाबदारी आमदार विलास पोतनीस आणि सुनील शिंदे यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. दिनेश बोभाटे यांना संघटन सचिव करण्यात आले आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून याबाबतचे माहिती पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
शिंदे गटाने शिवसेनेच्या मुख्यपदावर दावा ठोकला आहे. त्यातच उध्दव ठाकरे यांची शिवसेनापक्षप्रमुख पदाची मुदत काल संपली संपली. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्हाबाबतचा निर्णयही अद्याप दिलेला नाही. त्यामुळे ठाकरे गटाकडून स्थानीय लोकाधिकार महासंघाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. दरम्यान, उद्धव ठाकरे यांचा पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ संपल्याने पुढे त्यांना पद सोडावे लागणार की, ते पदावर कायम राहणार? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
अधिक वाचा : झवेरी बाजारात बोगस ईडी अधिकाऱ्यांचा छापा, 3 किलो सोन्यासह 25 लाखांची रोकड लुटली
बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनीच म्हणजेच 23 जानेवारी 2013 रोजी शिवसेना पक्षप्रमुखपदी उद्धव ठाकरेंची निवड झाली होती. त्यानंतर 2018 मध्ये शिवसेनेच्या कार्यकारिणीने पक्षप्रमुख म्हणून पुन्हा त्यांची निवड केली होती.