शिंदे गटाचे खासदार राहूल शेवाळे यांनी लोकसभेत सुशांतसिंह रजपूत आणि दिशा सालीयन यांच्या आत्महत्येच्या चैकशीवरून लोकसभेत प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले. राहूल शेवाळे यांनी लोकसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नाचे पडसाद राज्याच्या विधानभवनातही उमटले. उध्दव ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांनी टिका केली. यावर खासदार राहूल शेवाळे यांनी आजद पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली आणि धक्का दायक खुलासा केला. यामध्ये त्यांनी म्हटलय कि, या सर्व प्रकरणामागे उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचा हाथ असून त्यामागे पाकीस्तानचे हस्तक असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
आपल्या पत्रकार परिषदेत बोलताना खासदार राहूल शेवाळे म्हणाले, “संबंधित महिलेला मी कोरोना काळात मदत केली होती. मी तीला अर्थिक मदत केली होती. मी पैसे देणे बंद केल्यावर तिने मला ब्लॅकमेलींग करण्यास सुरवात केली. माझे फोटो वापरून बदनामी केली. या महिलेच्या भाऊ एका मर्डर आणि रेप केस आरोपी असून या प्रकरणाच्या मुळाशी ही महीला आहे.”
पुढे माहीती देताना ते म्हणाले, “दुबईमध्ये तीने नवीन ट्विटर अकाऊंट बनवून मला ब्लॅकमेलींग केले. याचा तपास मुंबई पोलीस आणि दिल्ली पोलीस यांच्याकडून केला आहे. तसेच दुबई पोलीसांच्या तपासातून तिने चालवलेले अकाऊंट हे पाकिस्तानी एजंटकडून चालवले जात होते हे सिद्ध झाले आहे.”अशी माहीती त्यांनी पत्रकारांना दिली.
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीवर आरोप करताना खा. शेवाळे म्हणाले, या महिलेने त्यांच्या कुटुंबाला बनावट ट्विटर अकाउंटवरून धमक्या दिल्या होत्या. तसेच तिच्या ट्विटर अकाऊंटला युवासेनेचे पदाधिकारी फॉलो करत असून ते तिच्या संपर्कात आहेत. या प्रकरणाच्या मुळाशी युवासेना प्रमुख असून शिवसेना (ठाकरे गट) आणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी मिळून आपले राजकिय करियर संपवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप खासदार शेवाळे यांनी केला. तसेच या प्रकरणाच्या मुळाशी पाकिस्तान तसेच दाउदच्या हस्तकांचा हात असून देशाच्या दृष्टीने ही अतिशय गंभिर बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








