ऑनलाईन टीम/तरुण भारत
निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यांनतर ठाकरे गट आणि शिंदे गटाला चिन्ह आणि नाव दिलं आहे. यांनतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पक्ष चिन्ह आणि नावाच्या वाटपामध्ये विरुद्ध बाजूला झुकतं माप दिल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाने केला आहे. तसेच आमची रणनीती तुम्ही उघड केली असा आरोप ठाकरे गटाने केला असून, निवडणूक आयोगाला १२ मुद्द्यांचं पत्र लिहिलं आहे. (Maharashtra Politics Thackeray Group Allegation Of Shinde Group On In Letter To Election Commission)
ठाकरे गटाने लिहलेल्या या पत्रात निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. याच निवडणूक आयोगानं चिन्हासंदर्भात जे निर्णय घेतले, त्या सर्व निर्णयांमध्ये उघडउघडपणे पक्षपातीपणा केल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.
हे ही वाचा : ऋतुजा लटकेंच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा; उद्या ११ पर्यंत राजीनामा स्वीकारण्याचे कोर्टाचे निर्देश
उद्धव ठाकरे यांच्या गटाने आम्ही दिलेले चिन्हांचे पर्याय निवडणूक आयोगाने जाणून-बुजून दुसऱ्या बाजूला कळतील, अशा पद्धतीने वेबसाईटवर टाकले, असा गंभीर आरोप निवडणूक आयोगावर ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. त्यांच्या याच भूमिकेमुळं शिंदे गटाला आमची सगळी रणनिती कळल्याचेही ठाकरे गटाचे म्हणणे आहे. काही वेळापूर्वीच हे तक्रार पत्र ठाकरे गटाच्या वकिलांनी निवडणूक आयोगात सादर केले.
ठाकरे गटाचा काय आहे आरोप?
नाव आणि पक्षचिन्ह वाटपामध्ये विरुद्ध बाजूला झुकतं माप दिल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला आहे. ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं असून यामध्ये १२ मुद्दे मांडण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयात पक्षपातीपणा केल्याचा ठाकरे गटाचा आरोप आहे. पत्रातून आयोगाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढण्यात आले आहेत.
आम्ही निवडणूक आयोगाकडे पक्षाचं नाव आणि चिन्हासाठी दिलेले पर्याय जे जाणुनबुजून वेबसाईटवर टाकण्यात आले. यामुळे शिंदे गटाला आमची रणनीती समजली. अन्यथा दोन्ही दोन्ही बाजूंचे पर्याय सारखेच कसे होते? अशी विचारणा ठाकरे गटाने केली आहे. ठाकरे गटाचे वकिल विवेक सिंह यांनी हे पत्र निवडणूक आयोगाकडे सोपवलं आहे.