आता एका खात्यावरुन तयार होणार पाच प्रोफाईल
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मेटाने फेसबुकच्या ग्राहकांसाठी आता नवीन फिचर्स भेटीला आणणार आहे. यामुळे आगामी काळात फेसबुक ग्राहकाचे एकच खाते राहणार असून त्यामध्ये जास्तीत जास्त पाच प्रोफाईल तयार करण्याची संधी मिळणार आहे.
फेसबुकचे हे नवीन फिचर्स अजूनही चाचणीमध्ये अडकून राहिले आहे. त्याची चाचणी विविध अंगानी पडताळणी करुन पूर्ण झाल्यावर ते ग्राहकांसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे.
प्राप्त अहवालानुसार फिचर्स चाचणीत बीटा ग्राहकांना आपल्या एकाच खात्यावरुन जवळपास पाच प्रोफाईल्स बनविण्याची सेवा कंपनी प्राप्त करुन देणार आहे. जे नवीन प्रोफाईल तयार होणार आहे, त्यामध्ये आपल्या मूळ नावाची माहिती देणे आवश्यक नसून यामुळे आपली ओळख लपवून कोणतीही पोस्ट किंवा कमेंट करता येऊ शकते. यावर मेटाच्या दाव्यानुसार नवीन प्रोफाईलला फेसबुकची पॉलीसीच मानावी लागणार आहे. म्हणजे आपल्या प्रोफाईलच्या माध्यमातून पॉलिसीचे उल्लंघन करण्यापर्यंत आपले मुख्य खातेच प्रभावीत होण्याची शक्यता आहे.
प्लॅटफॉर्म व्यस्त ठेवण्यावर भर
कंपनीच्या प्लॅटफॉर्मच्या मदतीने सार्वजनिक क्षेत्राच्या अनुषंगाने विविध कंपन्या एकाच वेळी वेगवेगळय़ा प्रोफाईल्स मॅनेज करण्याची सुविधा देत आहेत. याच प्रकारचा प्रयत्न आता मेटाकडून करण्यात येत आहे. यासोबतच कंपनी सोशल नेटवर्कच्या माध्यमातून आपले महत्व अधिकचे वाढवून युवा ग्राहकांपर्यंत आपल्या नेटवर्कचा विस्तार वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती आहे.









