पुढील सुनावणी 22 ऑगस्टला
प्रतिनिधी/ बेळगाव
येळ्ळूर मारहाण खटल्याची सुनावणी बुधवारी होती. न्यायालयात तपास अधिकारी तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक श्रीशैल ब्याकुड यांची साक्ष पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता एका खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात आहे. आणखी एका साक्षीदाराची साक्ष असून ती आता 22 ऑगस्टला होणार आहे.
येळ्ळूर मारहाण खटल्यातील गुन्हा क्रमांक 794 आणि 167 यांची सुनावणी होती. यामध्ये उपनिरीक्षकांनी आपली साक्ष नोंदविली आहे. यापूर्वी या खटल्यातील फिर्यादी हजर झाला नाही. त्यामुळे त्याला वगळण्यात आले होते. आता केवळ एक साक्ष बाकी असून या दोन्ही खटल्यांचा निकाल लवकरच लागणार आहे. या दोन्ही खटल्यांमध्ये एकूण 36 जण आहेत. त्यांच्यावर हा गुन्हा दाखल आहे.
न्यायालयात सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामुळे जेएमएफसी द्वितीय न्यायालयात साक्ष नोंदविण्यात आली आहे. कार्यकर्त्यांच्यावतीने अॅड. शामसुंदर पत्तार, अॅड. शाम पाटील, अॅड. हेमराज बेंचन्नावर हे काम पाहत आहेत.









