न्हावेली / वार्ताहर
तुम्ही निरवडे गावाच्या विकासासाठी निधी मागा मी द्यायला तयार असून गावाच्या विकासासाठी कोठेही निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही माजी आमदार राजन तेली यांनी दिली. निरवडे ,कोनापाल ,बांदिवडेकरवाडी ते नेमळे रस्ता खडीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ श्री तेली यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी निरवडे गावचे माजी सरपंच तथा सावंतवाडी खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन प्रमोद गावडे निरवडे सरपंच सुहानी गावडे उपसरपंच अर्जुन पेडणेकर,पंचायत समिती माजी सभापती प्रियांका गावडे,ग्रामपंचायत सदस्य आदेश जाधव,शिवसेना उपतालुकाप्रमुख संदिप पांढरे,संतोष गावडे,मोहन बांदिवडेकर,संदिप पायनाईक,दादा बांदिवडेकर,काका बांदिवडेकर,सुहास गावडे,दिनकर गावडे,शरद बांदिवडेकर,मोहन सावंत,विजय धारगळकर,दिनेश जाधव,गजानन बांदिवडेकर,मंगेश बांदिवडेकर,संदिप नाईक,विजय सावंत,बाळा सावंत,सुरज पायनाईक,सचिन मुळीक यांच्यासह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
पालकमंत्री रविंद्र चव्हाण आणि माजी आमदार राजन तेली यांच्या माध्यमातून आणि प्रमोद गावडे यांच्या प्रयत्नातून निरवडे ,कोनापाल,बांदिवडेकरवाडी जाणारा रस्ता मंजूर करण्यात आला आहे.त्याचे आज भूमिपूजन करण्यात आले याच रस्त्यावरील नदीवर पूल बांधण्यासाठी निधी मंजूर झालेला आहे.तसेच गावातील कोनापाल सातेरी मंदिर रस्ता निरवडे देऊळवाडी येथे साकव निरवडे वेत्ये रस्ता अशी बरीच कामे मंजूर झालेली आहेत. त्यासुद्धा कामांना लवकरच सुरुवात केली जाणार आहे अशी माहिती प्रमोद गावडे यांनी यावेळी दिली तर गावातील विकास कामांना निधी देणाऱ्या लोकप्रतिनिधींचे आणि श्री तेली यांचे त्यांनी आभार मानले यापुढे सुद्धा गावांसाठी निधी द्या,अशी मागणी केली. यावेळी गावाच्या विकासासाठी लागणारा निधी कमी पडू देणार नाही तुम्ही फक्त आम्हाला साथ द्या,अशी ग्वाही श्री तेली यांनी दिली.यावेळी श्री तेली यांचे स्वागत सरपंच सुहानी गावडे यांनी केले तर आभार प्रमोद गावडे यांनी मानले.









