महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टचे अध्यक्ष अजय बिरवटकर यांची ग्वाही ; गवळी समाज जिल्हा मेळावा उत्साहात
ओटवणे प्रतिनिधी
महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टच्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेचे काम कौतुकास्पद आहे. जिल्हयातील गवळी समाजाने संघटीत राहून समाजाचा विकास साधावा. तसेच जिल्ह्यात गवळी समाज भवन उभारण्यासाठी सुरुवातीला जागा खरेदीसाठी स्वतः वैयक्तिक आर्थिक सहकार्यासह त्यानंतर ट्रस्टच्यावतीने सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टचे अध्यक्ष अजय बिरवटकर यांनी दिली. महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टच्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्या १७ व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त माडखोल येथील रुद्र सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या गवळी समाजाच्या जिल्हा मेळाव्यात अजय बिरवटकर बोलत होते. यावेळी व्यासपिठावर महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टचे उपाध्यक्ष युवराज गवळी, विश्वस्त विजय गवळी, शाहूवाडी कार्याध्यक्ष श्री. खेतल, रुद्र गवळी, महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टच्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेचे कार्याध्यक्ष दशरथ शृंगारे, उपकार्याध्यक्ष बयाजी बुराण, सचिव नामदेव गो. गवळी, खजिनदार सिताराम केळुसकर, सहसचिव रामचंद्र भालेकर, सदस्य बाबुराव भालेकर, रामदास बुराण, विश्राम केळूसकर, कृष्णा पंदारे, प्रशांत हनपाडे, सुरेश वरेकर, प्रशांत बुराण, सिताराम गवळी, चंद्रसेन लाड, चंद्रकांत चिले, निकिता गवळी, अमिषा गवळी, सल्लागार शंकर काटाळे आदी उपस्थित होते.
जिल्ह्याचा गवळीरत्न पुरस्कार
रोहित वरेकर याला प्रदान
यावेळी कला कला क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसह संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात गवळी समाजाचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल सुप्रसिद्ध युवा आर्टीस्ट ओटवणे गावचा सुपुत्र रोहित सुरेश वरेकर याला ट्रस्टचा ‘गवळीरत्न’ हा मानाचा पुरस्कार ट्रस्टचे अध्यक्ष अजय बिरवटकर यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी रोहित वरेकरच्या अल्पावधीतील कार्यकर्तुत्वामुळे गवळी समाजात नव्या पिढीसाठी प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले असून रोहित वरेकर यांची यशोगाथा हा समाजासाठी दीपस्तंभ ठरेल असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. या गवळी समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांसह विविध स्पर्धा व परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या सर्वांना मान्यवरांच्याहस्ते गौरविण्यात आले. या गवळी समाज मेळाव्याला सिंधुदूर्ग जिल्हयातील गवळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टच्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेचे सदस्य बाबुराव भालेकर यांनी, सुत्रसंचालन बयाजी बुराण, सत्कार व पारितोषिक वितरण सूत्रसंचालन कार्याध्यक्ष दशरथ शृंगारे यांनी तर आभार सदस्य रामदास बुराण यांनी मानले.









