गगनयान मोहिमेंतर्गत रॉकेट 17 किमीपर्यंत वर पाठवले : 8 मिनिटांनी पॅराशूटद्वारे बंगालच्या उपसागरात अवतरण
वृत्तसंस्था/ श्रीहरिकोटा
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) शनिवारी गगनयान मोहिमेच्या क्रू एस्केप सिस्टमची यशस्वी चाचणी केली. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून सकाळी 10 वाजता रॉकेट प्रक्षेपित करण्यात आले. या चाचणीला टेस्ट व्हेईकल अॅबॉर्ट मिशन-1 (टीव्ही-डी1) असे नाव देण्यात आले. ही मोहीम 8.8 मिनिटांची होती. या मोहिमेत 17 किमी वर गेल्यानंतर, क्रू मॉड्यूल सतीश धवन अंतराळ केंद्रापासून 10 किमी दूर बंगालच्या उपसागरात उतरवण्यात आले. रॉकेटमध्ये बिघाड झाल्यास, अंतराळवीराला सुरक्षितपणे पृथ्वीवर आणणाऱ्या यंत्रणेची चाचणी घेण्यात आली.

इस्रोने केलेल्या पूर्वनियोजनानुसार शनिवारी सकाळी 7 ते 9 या वेळेत गगनयानाची चाचणी घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र, सुरुवातीला दोनवेळा हवामानामुळे चाचणीला थोडाफार विलंब करण्यात आला. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे ते पुढे ढकलून सकाळी 10 वाजता इस्रोच्या महत्त्वाकांक्षी गगनयान मोहिमेसाठी मानवरहित चाचणी उ•ाण यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आले. त्यानंतर इस्रोची टीव्ही-डी1 ची मोहीम पूर्णत: यशस्वी झाली आणि नियोजनाप्रमाणे पेलोड सुरक्षितपणे समुद्रात दाखल झाल्याचे जाहीर केले.
दोनवेळा मोहीम पुढे ढकलली
शनिवारी सकाळी ही मोहीम दोनदा पुढे ढकलण्यात आली. ते 8 वाजता प्रक्षेपित होणार होते, परंतु खराब हवामानामुळे त्याची वेळ बदलून 8.45 करण्यात आली. त्यानंतर प्रक्षेपणाच्या 5 सेकंदापूर्वी इंजिन प्रभावी होऊ न शकल्याने मिशन तात्पुरते स्थगित करण्यात आले. काही वेळाने इस्रोने ही चूक दुऊस्त करत 10 वाजता पुन्हा चाचणी करण्याचा निर्णय घेतला. अन् या प्रयत्नात रॉकेटने यशस्वी झेप घेतली. उ•ाणानंतर क्रू मॉड्यूल आणि क्रू एस्केप सिस्टम अंदाजे 17 किमी उंचीवर वेगळे झाले. त्यानंतर श्रीहरिकोटापासून 10 किमी अंतरावर समुद्रात उतरविण्यात आले. अन् मोहीम अगदी बिनचूकपणे फत्ते झाल्यानंतर शास्त्रज्ञांनी एकमेकांना आलिंगन देत आनंद साजरा केला.
…ही चाचणी अंतराळवीरांच्या सुरक्षित बचावाची!
या मिशनमध्ये प्रत्यक्ष मोहिमेदरम्यान रॉकेटमध्ये बिघाड झाल्यास अंतराळवीर सुरक्षितपणे कसे उतरतील याची चाचणी घेण्यात आली. या मोहिमेत एकूण चार चाचणी उ•ाणे पाठवायची आहेत. टीव्ही-डी1 नंतर आता टीव्ही-डी2, डी3 आणि डी4 यांच्या चाचण्याही नजिकच्या काळात केल्या जाणार आहेत. गगनयान मिशनची पहिली मानवरहित मोहीम पुढील वर्षाच्या सुऊवातीला नियोजित आहे. मानवरहित मिशन म्हणजे अंतराळात मानव पाठवला जाणार नाही. मानवरहित मोहिमेच्या यशानंतर एक मानवयुक्त मिशन असेल ज्यामध्ये मानव अंतराळात जाईल. इस्रोने मानव मोहिमेसाठी 2025 ची कालमर्यादा निश्चित केली आहे.
काही मिनिटातच त्रुटी केल्या दुरुस्त
ही मोहीम यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी या मोहिमेतील सुऊवातीच्या त्रुटींबद्दल माहिती दिली. ‘ग्राउंड कॉम्प्युटरला गैर-अनुरूपता आढळल्यानंतर लिफ्ट सुऊवातीला बंद करण्यात आली. आम्ही ही समस्या लक्षात येताच लगेच दुऊस्त करून उ•ाणासाठी सुधारित वेळ निश्चित केली. ही चाचणी करताना सर्व यंत्रणांनी उत्तम कामगिरी केली. चाचणी वाहन, क्रू एस्केप सिस्टम क्रू मॉड्यूल, सर्वकाही आम्ही पहिल्या प्रयत्नात पूर्णपणे प्रदर्शित केले असल्याचे सोमनाथ यांनी सांगितले.









