वृत्तसंस्था / कराची
इंग्लंडचा क्रिकेट संघ पुढील महिन्यात पाकच्या दौऱ्यावर येणार आहे. यजमान पाक आणि इंग्लंड यांच्यात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळविली जाणार आहे. या मालिकेतील सामने मुल्तान आणि रावळपिंडीत आयोजित केले असल्याची माहिती पीसीबीने दिली आहे.
उभय संघातील पहिली कसोटी 7 ते 11 ऑक्टोबर दरम्यान मुल्तानमध्ये, दुसरी कसोटी 15 ते 19 ऑक्टोबर दरम्यान मुल्तानमध्ये तर तिसरी कसोटी 24 ते 28 ऑक्टोबर दरम्यान रावळपिंडीत होणार आहे. 2 ऑक्टोबरला इंग्लंडचा क्रिकेट संघ मुल्तानमध्ये दाखल होईल









