बीकेसी या ठिकाणी होणार भव्य शोरुम
मुंबई : जगप्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क यांची कंपनी टेस्ला इंक यांनी मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथे भारतातील पहिले शोरूम भाड्याने घेतले आहे. शोरूम 881 प्रति चौरस फूट आकाराचे भाड्याने घेण्यात आले आहे. कंपनीने 2 नॉर्थ अव्हेन्यू, मेकर मॅक्सिटी, ग्राउंड फ्लोअर, युनिट जी-1बी साठी भाडेपट्टा करारावर स्वाक्षरी केली आहे. ही इमारत बीकेसीच्या प्रमुख व्यवसाय केंद्रात उभारलेली आहे आणि उच्च दर्जाची ऑफिस इमारत म्हणूनही याला ओळखले जाते.
टेस्लाचा मुंबईतील भाडे व्यवहार
27 फेब्रुवारी 2025 रोजी अंतिम झालेल्या या व्यवाहारांतर्गत, टेस्ला इंडियाने 2.11 कोटीची सुरक्षा ठेव जमा केली आहे. कंपनीला दरमहा 35.26 लाख भाडे द्यावे लागेल, जे दरवर्षी 5 टक्केने वाढेल. जवळपास 4,003 चौरस फूट ऑफिस स्पेससाठी आहे, ज्याचे भाडे प्रति चौरस फूट 881 आहे. सीआरइ मॅट्रिक्सने मिळवलेल्या कागदपत्रांनुसार, टेस्लाचे सुरुवातीचे मासिक भाडे 35,26,665 इतके राहणार आहे. भारतात टेस्लाच्या प्रवेशाची तयारी जोरदार सुरु आहे. कंपनीने रिक्त जागा देखील जाहीर केल्या आहेत.









