वृत्तसंस्था/टेक्सास
दिग्गज उद्योजक एलॉन मस्क यांनी आपल्या कंपनीमार्फत निर्मिती केलेल्या सायबर ट्रक्स पुन्हा मागविल्या आहेत. सदरच्या ट्रकमध्ये दोष असल्याचे कारण सांगून टेस्ला कंपनीने सायबर ट्रक मागविले आहेत. बाहेरच्या पॅनलमध्ये दोष असल्याचे कंपनीच्या निर्देशनास आले आहे. जवळपास 46 हजार सायबर ट्रक्स कंपनीने परत मागविल्या आहेत. ज्यांची निर्मिती 13 नोव्हेंबर 2023 ते 27 फेब्रुवारी 2025 या कालावधीत केली गेली होती. सायबर ट्रकचे पहिले उत्पादन 13 नोव्हेंबर 2023 रोजी करण्यात आले होते.









