अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टेस्लाचे सीईओ आणि ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनी भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून आपल्याला खूप आनंद झाला असून त्यांची भेट ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट असल्याचे इलॉन मस्क यांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “मी नरेंद्र मोदी यांचा खूप मोठा चाहता आहे. त्यांना भेटणं म्हणजे माझ्यासाठी एक सन्मान आहे. डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी त्यांनी राबवलेली धोरणे कौतुकास्पद आहेत.
त्यांना भारतासाठी अनेक महत्वाच्या गोष्टी करण्यासाठी नविन कंपन्यांना त्यांनी समर्थन देत आहेत.”
पुढे बोलताना ते म्हणाले, “मी पुढच्या वर्षी भारताचा दौरा करणार असून टेस्ला लवकरच भारतात येईल अशी माझी खात्री आहे. भारतात गुंतवणूक करणं हे नक्कीच महत्त्वाचं ठरणार असून याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची आणि माझी सकारात्मक आणि चर्चा झाली. भविष्यात आम्ही मोठी घोषणा करु. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो. ” या आशयाचं वक्तव्य मस्क यांनी केलं आहे.









