वृत्तसंस्था/ मुंबई
रविवारी येथे झालेल्या 2025 सालातील टाटा मुंबई मॅरेथॉनमधील नवे स्पर्धक विजेते ठरले. पुरूष विभागात इरीट्रीचा बेरहेनी टेसफे तर महिला गटात केनियाची जॉयसी चिपेकमोई टेली यांना विजेते म्हणून घोषित करण्यात आले.
पुरूष विभागात इरीट्रीचा 38 वर्षीय धावपटू टेसफेने 42.195 कि. मी. अंतर 2 तास, 11 मिनीटे आणि 44 सेंकदाचा अवधी घेत पार केले. टेसफेचे हे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमधील पहिले जेतेपद आहे. विश्व अॅथेलेटीक्स गोल्ड लेबल रोडरेस अंतर्गत या मॅरेथॉनमध्ये मुंबईच्या हजारो धावपटूंनी आपला सहभाग दर्शविला होता. दक्षिण आफ्रीका खंडातील इरीट्री या देशाचा नागरीक टेसफेने आपल्या देशाच्या किसेटीला मागे टाकले. किसेटीने 2 तास, 11 मिनीटे आणि 50 सेंकदाचा अवधी घेत दुसरे स्थान तर ईथोपियाच्या डिमेकीने 2 तास 11 मिनिटे, 56 सेपेंदाचा अवधी घेत तिसरे स्थान मिळविले.
महिलांच्या विभागात केनियाच्या 29 वर्षीय चिपेकमोल टेलिने चिपेकमोई टेलिने 2 तास, 24 मिनिटे, 56 सेंकेदाचा अवधी घेत विजेतेपद पटकाविले. बहरीनच्या शितेई ईसेटीने 2 तास, 25 मिनिटे, 29 सेंकेदाचा अवधी घेत दुसरे स्थान तसेच ईथोपियाच्या आर्मीनोने 2 तास, 27 मिनिटे, 58 सेंकदाचा अवधी घेत तिसरे स्थान पटकाविले. या स्पर्धेतील विद्यमान विजेते इथोपियाचे लेमीबेरहेनू आणि अबेराश मिनसेओ यांना ही शर्यत पूर्ण पार करता आली नाही. 2023 साली बेहरहेनोने या स्पर्धेचे जेतेपद मिळविले होते. पण यावेळी बेरहोनेला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या भारतीय धावपटूमध्ये पुरूष विभागात अनिश थापाने 2 तास, 17 मिनिटे आणि 23 सेंकेदाच अवधी घेत पहिले स्थान, तर मानसिंगने दुसरे आणि टी. गोपीने तिसरे स्थान पटकाविले. महिलांच्या विभागात निर्माबेन ठाकुरने पुन्हा जेतेपद स्वत:कडे राखले. सेवान बरवाल आणि एस. डोलकर यांनी अनुक्रमे पुरूष आणि महिलांच्या हाप मॅरेथॉनचे विजेतेपद मिळविले.









