वृत्तसंस्था/ इम्फाळ
मणिपूरमधील कुकी-मैतेई संघर्षाचे सत्र संपताना दिसत नाही. सशस्त्र दहशतवाद्यांनी पुन्हा डोके वर काढत वांशिक संघर्षग्रस्त जिरीबाममधील आदिवासी गावातील रहिवाशांवर हल्ला करून सहा घरांना आग लावली. ही घटना गुऊवारी रात्री जारोन हमर गावात घडली. दहशतवाद्यांच्या एका गटाने घरांना आग लावण्याचे हे कृत्य केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या हल्ल्यानंतर अनेक गावकरी पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यांनी जवळच्या जंगलात आश्र्रय घेतला. या हल्ल्यात गावातील एका महिलेचा मृत्यू झाल्याचा दावा कुकी संघटनांनी केला आहे. परंतु जिल्हा पोलिसांनी मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.









