वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीर पोलिसांनी बांदिपोरा जिल्ह्यातील केनसुआ गावात वाहन तपासणीदरम्यान एका दहशतवाद्याला अटक केली. हे दहशतवादी पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाची शाखा द रेझिस्टन्स फ्रंटशी (टीआरएफ) संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. दहशतवाद्यांकडून एक हँडग्रेनेडही जप्त करण्यात आला आहे. सीमेवरील अन्य एका कारवाईत पुंछ जिह्यात नियंत्रण रेषेचे (एलओसी) रक्षण करणाऱ्या लष्कराच्या जवानांनी सीमेपलीकडून घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडत दोन दहशतवाद्यांना ठार केले.









