ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुलवामामध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट पोलिसांनी उधळून लावला. 5 ते 6 किलो आयईडीसह एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. इश्फाक अहमद वानी असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून, तो दहशतवाद्यांचा मदतनीस आहे.
पुलवामा जिह्यातील अरिगाम भागात पोलिसांकडून शोधमोहिम सुरू असताना इश्फाक वानीला अटक करण्यात आली. त्याच्याकडून पोलिसांनी 5 ते 6 किलो आयईडी जप्त केले आहे. जी 20 बैठकीपूर्वी सुरक्षा दलांच्या वाहनांवर हल्ला करण्यासाठी या आयईडीचा वापर केला जाणार होता. पण या कारवाईमुळे मोठी दुर्घटना टळल्याचे पोलिसांनी सांगितले. वानीवर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू केला आहे.









