अन्य संशयितांच्या शोधासाठी दिवसभर मोहीम
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिह्यातील लैरो-परिगाम भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले. रविवारी रात्रीपासून सुरू झालेली ही चकमक सोमवारी दुपारर्पंत सुरू होती. या मोहिमेत जम्मू आणि काश्मीरचे पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा यंत्रणेचा सहभाग होता. काश्मीरमधील विभागीय पोलिसांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवऊन रविवारी रात्री चकमक सुऊ झाल्याची माहिती दिली होती. पुलावामामधील लैरो-परिगाम या भागामध्ये दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू आहे. या कारवाईमध्ये पोलीस आणि लष्करी जवान संयुक्तपणे सहभागी झाल्याचेही स्पष्ट करण्यात आले होते.
पुलवामातील काही भागांमध्ये दहशतवाद्यांनी आश्रय घेतल्याची गुप्त माहिती केंद्रीय सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. त्यानंतर या भागांमध्ये शोधमोहीम सुऊ करण्यात आली होती. या दरम्यान लष्करी जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. सुरक्षा यंत्रेणेने दहशवाद्यांच्या तळावर चोहीकडून गोळाबार सुऊ केला. रात्रभर चहुबाजूंनी घेराव घालत कारवाई सुरू ठेवण्यात आली. मात्र, अंतिमत: एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात यश आले. अजूनही काही संशयित दहशतवादी या भागात दबा धरून बसल्याची शक्यता गृहीत धरून शोधमोहीम सोमवारीही सुरू ठेवण्यात आली होती. मात्र, सायंकाळपर्यंत अन्य दहशतवादी यंत्रणांना सापडू शकला नव्हता.
दोन आठवड्यांपूर्वी जम्मू काश्मीरच्या राजौरी जिह्यामध्ये भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीतही एका दहशवाद्याला कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराला यश आले होते. जम्मू काश्मीरमधील राजौरी जिह्यामध्ये केंद्रीय सुरक्षा यंत्रणा आणि काश्मीर पोलिसांनी ही मोहीम राबवली होती. त्यापूर्वी कुलगाम आणि पुंछमध्ये देखील दहशतवाद्यांकडून घुसखोरी केल्याच्या घटना घडल्या होत्या.









