इंफाळ :
मणिपूरमधील थौबल जिल्ह्यातील सलुंगफाम मॅनिंग लेइकाई येथील हायस्कूलजवळ रविवारी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. यामध्ये एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले. तसेच सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईदरम्यान सहा दहशतवाद्यांना अटकही करण्यात आली आहे. थौबलमधील या चकमकीनंतर घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे, दारूगोळा व इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या शस्त्रास्त्रांमध्ये दोन इन्सास रायफल (5.56 मिमी), एक अमोघ रायफल (5.56 मिमी), एक .303 रायफल, एक एसएलआर (7.62 मिमी), एक इन्सास फोल्डिंग रायफल (5.56 मिमी), मोठ्या प्रमाणात दारूगोळा आणि पाच मोबाईल फोन्सचा समावेश आहे.









