ऑनलाईन टीम/तरुण भारत
जम्मू काश्मीरच्या (Jammu and Kashmir) राजौर जिल्ह्यात दहशतवाद्यांचा (Terrorist) घुसखोरीचा प्रयत्न भारतीय सुरक्षा जवानांनी हणून पडला. नौशेरा सेक्टरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून तीन दशहतवादी घुसखोरीचा प्रयत्न करत होते. यावेळी भूसुरुंग स्फोटामध्ये दोन दहशतवादी ठार झाले असून एकाला ताब्यात घेण्यात आलं असल्याची माहिती भारतीय लष्कराने दिली आहे.
यामधील दोन घुसखोर मात्र पाकिस्तानव्याप्त प्रदेशात पळून जाण्यात यशस्वी ठरले. लष्कराने दिलेल्या माहितीनुसार “दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात आलं असून तो जखमी आहे. त्याला वैद्यकीय मदत देण्यात आली असून, सर्जरीही केल्यामुळे त्याचा जीव वाचला”.
दरम्यान, ताब्यात घेण्यात आलेल्या दहशतवाद्याला याआधीही नियंत्रण रेषा पार केल्यामुळे अटक करण्यात आली होती. पण माणुसकीच्या नात्याने त्याला पुन्हा परत पाठवण्यात आलं होतं. भारतीय चौकीवर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानी अधिकाऱ्याने त्याला ३० हजार रुपये (पाकिस्तानी चलन) रुपये दिले होते तसेच यामधील दोन घुसखोर मात्र पाकिस्तानव्याप्त प्रदेशात पळून जाण्यात यशस्वी ठरले. लष्कराने दिलेल्या माहितीनुसार “दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात आलं असून तो जखमी आहे. त्याला वैद्यकीय मदत देण्यात आली असून, सर्जरीही केल्यामुळे त्याचा जीव वाचला. असंही लष्कराने सांगितलं आहे.
चौकशीदरम्यान त्याने आपल्याला पाकिस्तान लष्करातील अधिकारी यूनुस चौधरी याने पाठवल्याचे सांगितले आहे. त्याला भारतात घुसखोरी करत हल्ल्यासाठी केवळ २५ ते ३० हजार रुपये देऊन पाठवले होते. त्याने २ ते जणांसोबत भारतीय लष्कराच्या चौकीवर हल्ला करण्याची योजना आखली होती. मात्र ही योजना जवानांनी उलथून लावली आहे.
घुसखोर दहशतवादी हुसैन याने २०१६ साली त्याचा भाऊ हारून अलीसोबत भारतात घुसण्याचा प्रयत्न केला होता. मात्र लष्कराने त्याला मानवतेच्या आधारावर सोडून दिले. पण आता दुसऱ्यांदा दहशतवादी कारवाई करताना त्याला अटक करण्यात आली होती.