व्हर्च्युअल आयडी तयार करण्यात होता तरबेज
वृत्तसंस्था/ लखनौ
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षा यंत्रणा अत्यंत अलर्ट आहेत. काही दिवसांपूर्वी उत्तरप्रदेशच्या सहारनपूर येथून एनआयए आणि एटीएसने नदीम नावाच्या दहशतवाद्याला अटक केली होती. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर एटीएसने रविवारी कानपूर येथे जैश-ए-मोहम्मदशी संबंधित आणखी एका दहशतवाद्याला पकडले आहे. हबीबुलउल इस्लाम उर्फ सैफुल्लाह असे त्याचे नाव आहे. हबीब हा व्हर्च्युअल ओळखपत्रे तयार करण्यास तरबेज होता.
टेलिग्राम, व्हॉट्सऍप, फेसबुक मेसेंजर यांच्या माध्यमातून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील हँडलरच्या संपर्कात हबीबुल होता. हा दहशतवादी मूळचा बिहारमधी मोतिहारी येथील रहिवासी आहे. सैफुल्लाह हा आयएसआयच्या निर्देशानुसार उत्तरप्रदेश-उत्तराखंडमध्ये नवे मॉडय़ुल तयार करत होता. सैफुल्लाहने याची जबाबदारी नदीमला दिली होती. सैफुल्लाहने नदीमला पीओकेत जाऊन आत्मघाती हल्ले आणि शस्त्र हाताळण्याचे प्रशिक्षण घेतले होते.









