जम्मू :
जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात मंगळवारी पहाटे एक टेम्पो खोल दरीत कोसळल्याने कमीतकमी चार जणांचा मृत्यू झाला तर 8 जण जखमी झाले आहेत. जम्मू येथून बागनकोटच्या दिशेने जाणारा टेम्पो खोल दरीत कोसळला. दुर्घटनेपूर्वी चालकाने वाहनावरील नियंत्रण गमाविले होते असा अनुमान व्यक्त केला जात आहे. जखमींना पोलिसांनी त्वरित रुग्णालयात पोहोचविले आहे. जखमींच्या प्रकृतीविषयी अद्याप माहिती कळलेली नसल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.









