तिरुपूर/
तामिळनाडूच्या ओलापलायमनजीक कार आणि बसची टक्कर झाली आहे. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 3 महिन्यांच्या मुलीचा देखील समावेश आहे. संबंधित कुटुंब हे थिरुकादैयुर येथील एका मंदिरात दर्शन घेऊन कारने परतत असताना बसने धडक दिली होती. या दुर्घटनेत एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदवून घेत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.









