सांगली
लग्न सोहळ्यावरून परतताना भरधाव I-10 कार नदीपात्रात कोसळली. सांगली- जयसिंगपूर हद्दीतील अंकली पुलावर हा भीषण अपघात झाला. कृष्णा नदी पुलावरून भरधाव गाडी कोसळून पती पत्नी सह तीन जण ठार, तर तीनजण गंभीर जखमी झाले आहे. जखमींमध्ये एका पाच वर्षाच्या मुलाचा समावेश आहे.
मध्यरात्री एकच्या सुमारास कोल्हापूरवरून सांगलीकडे येताना अंकली पुलावर हा अपघात घडला. सांगलीकडे येताना गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी थेट कृष्णा नदीपात्रात कोसळली. या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला. मृतात दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. मृत कुटुंबीय हे सांगलीतल्या कोल्हापूर रोडवरील गंगाधर कॉलनी येथील रहिवासी आहेत.








