Mumbai : मुंबईत २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सणासुदीच्या काळातच मुंबईमध्ये पुन्हा एकदा हल्ला होणार असल्याच्या धमक्या देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यानंतर राजकीय क्षेत्रातून देखील याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी अशा प्रकरच्या धमक्यांना गांभिर्याने घेतलं पाहिजे असे म्हटलं आहे., मुकेश अंबानी यांच्या कुटुंबाला देखील अशी धमकी देण्यात आली होती असेही ते म्हणाले.
यावेळी बोलताना ते म्हणाले, नेकदा अशा धमक्या येतात, मुकेश अंबानी यांच्या कुटुंबाला देखील अशी धमकी देण्यात आली होती, त्याच्या खोलात गेल्यानंतर ते माथेफीरू विकृत लोकं अशा प्रकारे बोलतात. धमकी ही गांभिर्याने घेतली पाहीजे. आपली पोलिस यंत्राणा सक्षम आहे. अशा धमक्या जेव्हा येतात तेव्हा केंद्राने देखील यामध्ये लक्ष देऊन गांभिर्याने दखल घेतली पाहिजे आणि सरकार घेईल अशी अपेक्षा करुया असे विरोधीपक्ष नेते अजित पवार म्हणाले.
Previous Articleतीन ‘मास्टर माईंडस्’च्या आवळल्या मुसक्या
Next Article ”गोल्डन पॉईंट”सिंधुदुर्गवर परप्रांतीयांचा डल्ला








