क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
टेनविक स्पोर्ट्स एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड आयोजित आंतरशालेय टेबल टेनिस स्पर्धेला मोठ्यात उत्साहात प्रारंभ झाल्या. या स्पर्धेच्या उद्घाघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून केएलई स्कूलचे प्राचार्य रूपाली कागे, स्पर्धा सचिव विपुल चौगुले , राघवेंद्र रायकर, ओमकार चव्हाण, रोहित दोडवड, रवी पिल्ले सुशांत गुंजीकर, शिवा नायक आदी मान्यवर उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचे हस्ते टेबल टेनिस बोर्डला पुष्पहार घालून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी रूपाली कागे म्हणाल्या शालेय जीवनापासूनच खेळाची आवड असणे गरजेचे आहे तरच आपले शरीर सुदृढ बनते. अभ्यासाबरोबर खेळ खेळणे तितकेच महत्त्वाचे आहे. सध्याच्या तांत्रिक युगात खेळाडू मोबाईलकडे वळले आहेत. असे न होता त्याने रोज थोडा वेळ तरी खेळाकडे लक्ष दिले पाहिजेत. तनवी अशा स्पर्धा भरून खेळाडूंना प्रोत्साहन दिले आहे त्याचा फायदा घ्यावा. सदर स्पर्धेत विविध शाळांमधून जवळपास शंभरहून अधिक टेबल टेनिसपटूनी भाग घेतला आहे. दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेची अंतिम फेरी रविवारी होणार असून त्यानंतर बक्षिस वितरण समारंभ केला जाईल.









