प्रतिनिधी /पणजी
गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज दि. 1 जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेटय़े आज बुधवारी सायं. 5.30 वा. पत्रकार परिषदेतून निकाल जाहीर करणार आहेत. राज्यातील 31 केंद्रे आणि 173 उपकेंद्रातून दोन सत्रात ही परीक्षा घेण्यात आली होती. त्यातील पहिले सत्र 1 डिसेंबर 21 ते 12 जानेवारी 22 दरम्यान तर दुसरे सत्र 5 ते 26 एप्रिल 2022 दरम्यान घेण्यात आले होते. एकूण 20572 मुले परीक्षेला बसली होती. त्यात 10530 मुले आणि 10042 मुलींचा समावेश होता. दरम्यान निकाल जरी आज जाहीर होणार असला तरी विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिका दि. 3 जून रोजी सकाळी 9 वाजल्यापासून गोवा बोर्डाच्या www.gbshse.info या वेबसाईटवरून डाऊनलोड करता येणार आहेत.









