संगोळ्ळी रायण्णा वसती शाळेची स्वाती तोलगी तालुक्यात सर्व माध्यमात प्रथम
वार्ताहर / खानापूर
खानापूर तालुक्मयाचा दहावीचा निकाल 84.97 टक्के लागला असून संगोळ्ळी रायण्णा वसती शाळेची विद्यार्थिनी स्वाती सुरेश तोलगी हिने कर्नटकात 625 गुण घेऊन उच्चांक साधला आहे. तालुक्मयातील मराठी माध्यमिक शाळांमध्ये ताराराणी हायस्कूलची संजना नारायण घाडी तसेच इदलहोंड येथील गुरुवर्य शामराव देसाई हायस्कूलची प्रणिषा परशराम चोपडे यांनी प्रत्येकी (621 गुण) 99.36 टक्के गुण घेऊन मराठी विभागात पहिल्या आल्या आहेत.
तालुक्मयातून 3657 विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यामध्ये 3100 विद्यार्थी पास झाले आहेत. यावषी दहावीचा निकाल चांगला लागला असून अनेक विद्यार्थी विशेष गुणवत्तेसह उत्तीर्ण झाल्याचे दिसून आले. या वषीही निकालात मुलींची सरशी असून सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षण खात्याच्यावतीने अभिनंदन होत आहे.
गेल्या दोन वर्षात कोरोना संक्रमणामुळे शैक्षणिक खात्याचे गणितच कोलमडले होते. मागील वषी गुणात्मक निकाल देण्यात आला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता कुणाला कळली नाही. गेल्या पाच-सहा वर्षांमध्ये दहावीचा निकाल तालुक्मयामध्ये समर्पक लागला होता. मात्र, 2019-20 मध्ये निकालात मोठी घसरण झाली होती. यावषी 2021-22 सालाचा हा निकाल समाधानकारक लागला
आहे.
तालुक्मयात संगोळ्ळी रायण्णा वसती शाळेची विद्यार्थिनी स्वाती सुरेश तोलगी 625 गुण घेऊन राज्यात व तालुक्मयात उच्चांक साधला आहे. ती कन्नड विभागातून टॉपर ठरली आहे. मालती सिद्धाप्पा कम्मार (संगोळ्ळी रायण्णा वसती शाळा) ही 623 (99.68 टक्के) गुण घेऊन तालुक्मयात दुसरी आली. हिरेमुनवळ्ळी जीएसटी विद्यालयाची भूमिका ईश्वर भरद्वार ही 622 गुण (99.53 टक्के) घेऊन तालुक्मयात तिसरी आली आहे. सुश्मिता राजेंद्र होनगेकर ही 620 गुण घेऊन तालुक्मयात कन्नड विभागात तिसरी आली आहे.
मराठी विभागातही मुलींचीच सरशी
दहावीच्या निकालात मराठी विभागातून इदलहोंड हायस्कूलची मनीषा चोपडे व ताराराणी हायस्कूलची संजना घाडी या संयुक्त 621 (99.36 टक्के) गुण घेऊन तालुक्मयात पहिल्या आल्या आहेत. प्रियांका देवलतकर ही 617 गुण घेऊन तालुक्यात दुसरी, ताराराणी हायस्कूलची अर्चना नागेश पाटील ही 608 गुण घेऊन तालुक्मयात तिसरी व गुरुवर्य शामराव देसाई हायस्कूलची अमुल्या रामचंद्र कुलम ही 607 गुण घेऊन चौथी आली आहे.
उर्दू विभागात हुजाप्पा इम्तियाज टेकडी हा 568 गुण घेऊन तालुक्मयात प्रथम, आसिफा महंमद सनदी ही 565 गुण घेऊन द्वितीय व हापिया कित्तूर ही 569 गुण घेऊन तिसरी आली. या तिघी खानापूर उर्दू शाळेच्या विद्यार्थिनी आहेत.
संगोळ्ळी रायण्णा शाळेची मालती कम्मार 98.69 टक्के गुण घेऊन इंग्रजी विभागात तालुक्मयात पहिली आली आहे. विजयालक्ष्मी हादीमनी ही 621 गुण घेऊन दुसरी तर सर्वोदया विद्यालयाचा शाप एम. कित्तूर 98.88 टक्के गुण घेऊन तालुक्मयात तिसरा आला आहे.









