नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारत आणि चीनदरम्यान द्विपक्षीय संबंध सुरळीत करण्यासाठी एलएसीवरील (प्रत्यक्ष नियंत्रण रेषा) ‘दीर्घकाळापासून असलेल्या स्थिती’ला त्वरित हाताळण्याच्या गरजेवर भर दिला आहे. भारत आणि चीनदरम्यान स्थिर आणि शांततापूर्ण संबंध पूर्ण क्षेत्र आणि जगासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे मोदींनी एका मुलाखतीत नमूद केले आहे.
आमच्या सीमांवर दीर्घकाळापासून असलेल्या स्थितीवर त्वरित तोडगा काढण्याची गरज आहे. हा तोडगा काढण्यास यश आले तरच द्विपक्षीय संबंध सुरळीत होणार आहेत. राजनयिक आणि सैन्य स्तरावर सकारात्मक आणि रचनात्मक चर्चेतून आम्ही आमच्या सीमांवर शांतता आणि स्थैर्य बहाल करण्यास सक्षम होऊ अशी आशा आणि विश्वास असल्याचे मोदींनी म्हटले आहे.









