Tension in Malvan over sale of fish on electric scales
पारंपरिक मच्छीमार आक्रमक, पोलिसांसमक्ष मासळी ओतली
मालवण / प्रतिनिधी
इलेक्ट्रिक वजनकाट्यावर सकाळच्या सत्रात किरळोळ मासे विक्री केली जात असल्याच्या कारणावरून शुक्रवारी सकाळी मालवण मासळी मार्केट समुद्रकिनारी तणाव निर्माण झाला होता. इलेक्ट्रिक वजनकाट्यास विरोध करणाऱ्या संतप्त मासे विक्रेता महिलांनी वजनकाटेधारक विक्रेत्यांचे मासे किनाऱ्यावर ओतून टाकले. यावेळी उपस्थित पोलासांनी दोन्ही बाजूच्या लोकांचे म्हणणे ऐकून घेत मालवण पोलीस ठाण्यात चर्चेसाठी येण्याचे आवाहन केले.









