प्राथमिक कृषी पत्तीनची निवडणूक : आभार मानण्यासंदर्भात लावला होता फलक : काकती पोलिसात तक्रार दाखल
वार्ताहर/अगसगे
अगसगे येथील प्राथमिक कृषी पतीन सहकारी संघाच्या सभासद मतदार बांधवांचे आभार मानण्यासंदर्भात फलक लावले होते. मात्र मंगळवारी दि. 17 रोजी रात्री काही अज्ञात समाजकंटकांनी तो फलक फाडून नेला आहे. त्यामुळे बुधवारी गावामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. याची माहिती मिळताच काकती पोलीस घटनास्थळी आले आणि तो फलक बाजूला काढून ठेवला. याबाबत काकती पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. दि. 23 नोव्हेंबर रोजी प्राथमिक कृषी पतीन सहकारी संघाच्या 11 जागांसाठी निवडणूक झाली होती. या निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या सहा विजेत्या उमेदवारांनी आपल्या छायाचित्रासह मतदारांचे आभार मानण्यासंदर्भात गावच्या वेशीच्या बाजूला फलक लावला होता. गेल्या आठ ते दहा दिवसापासून फलक व्यवस्थित होता मात्र, याचे काहीना पोटशुळ उठले अन् तो फलक काही अज्ञातांनी काढून नेल्याने गावांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. याबाबत गावामध्ये दिवसभर उलटसुलट चर्चा सुरू आहे. प्रकरण शांतपणे हाताळण्यासाठी काकती पोलीस बुधवारी दिवसभर अधून-मधून फेऱ्या मारत आहेत.
काकती पोलीस दाखल
घटनेची माहिती समजतात काकती पोलीस स्थानकाचे निरीक्षक सुरेश शिंगे आपल्या पोलिसासह गावात येऊन फाडण्यात आलेल्या फलकाची पाहणी करून तो अन्यत्र ठेवला. ‘त्या’ अज्ञाताला पकडून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन सत्ताधारी सदस्यांना दिले. त्यामुळे प्रकरण सध्या शांत झाले आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन अज्ञातांची छबी कैद
पूर्वनियोजित कट रचून आलेले दोन अज्ञातांची छबी सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसत आहे. ग्रामपंचायतने लावलेल्या सीसी कॅमेऱ्यामध्ये बुधवारी मध्यरात्री एक वाजता ते दोघे पलकाच्या बाजूने फिरुन तो फाडून घेऊन जाण्याचे दृश सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे. सध्या ते फुटेज पोलिसांनी घेतले आहे. त्या दोन युवकांची शहानिशा करून पुढील कारवाई करणार आहेत.
काकती पोलीस स्थानकात तक्रार दाखल
फलक फाडल्याने गावात विनाकारण तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे त्या समाजकंटकांना पकडून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी व आपल्याला न्याय मिळवून द्यावा अशी तक्रार प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाचे अध्यक्ष शिवपुत्र मेत्री यांनी काकती पोलीस स्थानकात केली आहे.
सध्या शांततेचे वातावरण
काकती पोलिसांनी या प्रकरणाची गंभीरपणे दखल घेतली असून, त्या अज्ञात युवकांना त्वरित पकडून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन सत्ताधारी सदस्यांना दिले आहे. यामुळे सध्या गावात शांततेचे वातावरण आहे.









