बेंगळूर :
शिमोगा येथे रविवारी ईद मिलाद मिरवणूक मोठ्या थाटात साजरा सुरू असतानाच शहरातील शांतीनगरच्या रागीगु• परिसरात दगडफेकीची घटना घडल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते. जलद कृती दलाच्या जवानांनी घटनास्थळी तात्काळ भेट देऊन जमावाला पांगवत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. जिल्हा पोलीसप्रमुख जी. के. मिथुनकुमार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. शिमोग्याचे जिल्हाधिकारी सेल्वमणी यांनी दगडफेकीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून शिमोगा येथील शांतीनगर येथील रागीगु• भागात कलम 144 लागू करण्याचे आदेश दिले आहेत.









