वृत्तसंस्था/लंडन
बोस्नियाचा माजी टेनिसपटू जेस्मिना टिनजिकवर मॅच फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळल्याने त्याच्यावर सहा वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. 2013 साली एटीपीच्या मानांकनात 236 व्या स्थानावर असलेल्या टिनजिकवर टेनिस क्षेत्रात 2017-18 साली मॅच फिक्सिंग करण्याचे आरोप ठेवण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय टेनिस इंटिग्रेटी एजन्सीतर्फे झालेल्या सुनावणीवेळी टिनजिकने आपला गुन्हा कबुल केला. आपल्याकडून मॅच फिक्सिंगच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे त्याने सांगितले. स्वीडनमध्ये टिनजिकवर यापूर्वी साडेचार वर्षांची बंदी मॅच फिक्सिंग प्रकरणात घालण्यात आली होती. टिनजिकवरील बंदीचा कालावधी 17 मे 2028 रोजी संपणार आहे.









